‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेचे आयोजन

दहावी-बारावीनंतर करीअरची योग्य वाट निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा २५ आणि २६ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘हॉटेल सेंट्रल पार्क’ शिवाजीनगर येथे होणार आहे. या कार्यशाळेच्या प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिळू शकतील. सहभागासाठी ऑनलाईन नोंदणीही सुरू आहे.

दहावी-बारावीनंतरच्या संधी तसेच उच्चशिक्षणाच्या वाटा आणि त्यातील आपल्याला योग्य क्षेत्र कसे निवडावे यावर प्रसिद्ध करीअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. अपयशाला सामोरे कसे जायचे, तणावाचे नियमन कसे करायचे याचा कानमंत्र प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार देणार आहेत. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षेच्या तयारीबाबत डॉ. अभय अभ्यंकर. डॉ. अतुल ढाकणे संवाद साधणार आहेत. समाज माध्यमांच्या प्रभावी वापरातून करीअर कसे घडवावे त्याचबरोबर जाहिरात क्षेत्रातील संधींबाबत नामवंत जाहिरात संस्थेचे संचालक ऋग्वेद देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. चांगल्या आवाजाच्या शोधात असणारे निवेदन, डिबग, व्हॉइसओव्हर, रेडिओ जॉकी यांसारखे पर्याय प्रसिद्ध निवेदक डॉ. अमित त्रिभुवन उलगडून दाखवतील. क्रीडा क्षेत्रातील करीअर संधींवर पत्रकार मिलिंद ढमढेरे प्रकाश टाकणार आहेत.

ही कार्यशाळा दोन दिवस होणार आहे. या दोन्ही दिवशी विषय आणि वक्ते सारखेच असतील. कार्यशाळेसाठी एका दिवसाला ३० रुपये प्रवेशशुल्क असून सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यशाळेच्या प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मिळू शकतील. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणीही करता येईल.

महत्त्वाचे काही

* कार्यशाळा कधी होणार- २५ आणि २६ मे, सकाळी ९ ते सायंकाळी ५

* कुठे होणार – हॉटेल सेंट्रल पार्क, बापूसाहेब गुप्ते मार्ग, (जंगलीमहाराज रस्त्याजवळ) शिवाजीनगर

* प्रवेशिका शुल्क – एका दिवसाचे ३० रुपये (दोन्ही दिवस वक्ते आणि विषय सारखे असतील)

* प्रवेशिका कुठे मिळतील- ‘लोकसत्ता एक्सप्रेस हाऊस, १२०५/ ०२़/ ०६ शिरोळे रस्ता (संभाजी बागेसमोरील गल्ली) शिवाजीनगर

* प्रवेशिका मिळण्याची वेळ – सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

* ऑनलाईन नोंदणीसाठी –  https://www.townscript.com/e/loksatta-marga-yashacha-pune-133304

प्रायोजक

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेसाठी ‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी, मुंबई’ हे टायटल पार्टनर आहेत. ‘विद्यालंकार’ आणि ‘एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सटिी, पुणे’ हे असोसिएशन पार्टनर आहेत. सपोर्टेड बाय ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ आणि पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करीअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ आणि ‘लक्ष्य अ‍ॅकॅडमी, ‘युवर फिटनेस्ट’ हे हेल्थ पार्टनर आहेत.