यंदाच्या द्राक्ष हंगामात महाराष्ट्रातून जगभरात द्राक्षांची निर्यात सुरू आहे. देशातून आजवर १ लाख २५ हजार टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यापैकी युरोपला ३८,५५६ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातीत राज्याचा वाटा जवळपास ९५ टक्क्यांपर्यंत आहे. मार्च, एप्रिल महिन्यांत वेगाने द्राक्ष निर्यात होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातून सव्वा लाख टन द्राक्षांची निर्यात झाली असून, प्रामुख्याने बांगलादेशला ३१६५९ टन, संयुक्त अरब अमिरातीला ४७२८ टन, नेपाळला ६४१३ टन आणि रशियाला ११६८ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. युरोपला देशातून ३८.५५६ लाख टनांची निर्यात झाली आहे, त्यात राज्याचा वाटा ३८,५३१ टन इतका आहे. नेदरलँण्डला सर्वाधिक २८७२८ टन, ब्रिटनला ३४०७ टन, जर्मनीला २०१२ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.राज्यात नाशिक जिल्ह्याने निर्यातीत मोठी आघाडी घेतली आहे. नाशिकमधून ३५७९९ टन, सांगलीतून १६०२ टन, सोलापुरातून ५७१ टन, नगरमधून २०० टन, पुण्यातून १७३ टन, लातूरमधून ५० तर उस्मानाबादमधून ३२ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Export of half a million tons of grapes amy
First published on: 02-03-2023 at 02:38 IST