scorecardresearch

पुणे: आनंदाबरोबरच दडपण आणि जबाबदारीचेही भान; ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची भावना

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात कलाप्रस्तुतीची संधी मिळाल्याने आनंदासोबतच दडपण आणि जबाबदारीचे भान आहे

पुणे: आनंदाबरोबरच दडपण आणि जबाबदारीचेही भान; ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची भावना

चोखंदळ पुणेकरांसमोर कला सादर करताना दडपण असतेच. मात्र सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात कलाप्रस्तुतीची संधी मिळाल्याने आनंदासोबतच दडपण आणि जबाबदारीचे भान आहे, अशा भावना ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पहिल्यांदाच आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>>पुणे: दोर तुटल्याने गिर्यारोहकाचा मृत्यू; मुळशी तालुक्यातील तैलबैला गडावर दुर्घटना

जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका पद्मा तळवलकर यांच्या शिष्या यशस्वी सरपोतदार म्हणाल्या, या स्वरमंचावर कला सादर करायला मिळावी, हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. भारतरत्न पं भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वर्षी ही संधी मिळाली याचा मला आनंद आहे. गुरूंनी माझ्यावर जे कष्ट घेतलेत त्याचं चीज झाले असे मला वाटते. अनेक मोठ्या कलाकारांनी या ठिकाणी आपली कला सादर केलेल्या या व्यासपीठाची परंपरा गौरवशाली आहे. त्या स्वरमंचावर मी गायनसेवा रूजू करणार आहे. हे केवळ सादरीकरण नाही तर आमच्यासारख्या पुढच्या पिढीवर टाकलेली एक जबाबदारी आहे असे मी मानते.

हेही वाचा >>>पुणे: तापमानात वाढ, पावसाची हजेरी; आणखी दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता

पं भीमसेन जोशी यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराने मुहूर्तमेढ रोवलेल्या महोत्सवात सादरीकरणाची संधी मला यावर्षी मिळत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे, अशी भावना बनारस घराण्याचे बासरीवादक पं. राजेंद्र प्रसन्ना यांनी व्यक्त केली. चोखंदळ आणि जाणकार रसिक असलेल्या पुण्यामध्ये सादरीकरण करणे ही कलाकारांसाठी भाग्याची गोष्ट असते. राजेश व रिषभ या मुलांसमवेत गायकी अंगाने बनारसी शैलीतील बासरीवादनाची झलक आम्ही पुणेकरांना दाखवणार आहोत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 11:23 IST

संबंधित बातम्या