३० नोव्हेंबपर्यंत परवानगी

पुणे : सार्वजनिक न्यास आणि धर्मादाय संस्थांचे वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यास राज्याचे धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी मुदतवाढ दिली आहे. सार्वजनिक न्यास आणि धर्मादाय संस्थांनी ३० नोव्हेंबपर्यंत वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करावेत, असे आवाहन धर्मादाय विभागाकडून करण्यात आले आहे.

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
Complaint to the Election Commission against Mahavitaran under jurisdiction of Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरणविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या कारण…
A rational basis is required to declare willful default reserve bank
‘हेतुपुरस्सर कर्जबुडवे’ घोषित करण्यासाठी तर्कसंगत आधार आवश्यक

मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या अंतर्गत नियमांनुसार संबंधित संस्थांना दरवर्षी सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण करून घेऊन अहवाल प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर ऑनलाइन सादर करावा लागतो.

नियमानुसार लेखापरीक्षण अहवाल अपलोड झाल्यानंतर त्याची ऑनलाइन पोहोच प्राप्त होते. त्यानंतर या ऑनलाइन पोहोचसह संपूर्ण लेखापरीक्षण अहवाल ३० सप्टेंबरपूर्वी धर्मादाय विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा लागतो.

यंदाच्या वर्षी प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने कोणतीही कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नव्हते तसेच त्याची पोहोचही मिळू शकत नव्हती.

त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ही बाब पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम-जहागीरदार यांनी धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारने यांना ईमेलद्वारे कळविली.

त्यानुसार धर्मादाय आयुक्त विभागाने लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे.

सार्वजनिक न्यास आणि धर्मादाय संस्थांनी ३० नोव्हेंबरपूर्वी लेखापरीक्षण अहवाल सादर करून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन अ‍ॅड. कदम-जहागीरदार यांनी केले आहे.