Premium

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा; विक्रेत्याला वर्गणीसाठी धमकी

लष्कर भागातील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याला धमकावून एक हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

crime news
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : लष्कर भागातील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याला धमकावून एक हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. निलेश दशरथ कणसे (वय ३९, रा. जान महंमद स्ट्रीट, लष्कर), अविनाश राजेंद्र पंडित (वय ३२, रा. शिंपी आळी, महात्मा गांधी रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश पाटणे (वय ३७, रा. कोंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाटणे यांचे लष्कर भागात चहा विक्रीचे दुकान आहे. कणसे, पंडित वर्गणीसाठी दुकानात आले होते. पाटणे यांनी त्यांना १५१ रुपये दिले. त्यानंतर कणसे आणि पंडित यांनी त्यांच्याकडे एक हजार रुपये मागितले. पाटणे यांनी एक हजार रुपये देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यांना मारहाण केली.  पाटणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर कणसे आणि पंडित यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Extortion case against ganesh mandal workers threat to seller pune print news rbk 25 ysh

First published on: 25-09-2023 at 22:16 IST
Next Story
पुणे : महाविद्यालयीन युवतीवर मद्य पाजून बलात्कार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा