राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के प्राध्यापक भरतीचे धोरण लवकरच ; शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची माहिती

स्वायत्तता मिळालेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र दिले जाते.

राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के प्राध्यापक भरतीचे धोरण लवकरच ; शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची माहिती
( शिक्षण संचालक डॉ. धनराज माने )

राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये शंभर टक्के प्राध्यापक पदभरतीचे धोरण लवकरच आणणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी गुरुवारी दिली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चतर्फे (आयएमडीआर) आयोजित ‘अभिवृद्धी : मेकिंग इंडिया ए फाइव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात माने बोलत होते. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, विश्वस्त जगदीश कदम, आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन आदी या वेळी उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होण्यासाठी विविध क्षेत्रात काय करता येईल याबाबतच्या संशोधनात्मक लेखांचा या पुस्तकात समावेश आहे.

माने म्हणाले, की ज्ञानाचा प्रचार, प्रसार, निर्मिती आणि संवर्धन करण्यासाठी शिक्षणाची समाजाशी नाळ जोडली पाहिजे. सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) वाढवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्कता आहे.

स्वायत्तता मिळालेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र दिले जाते. लवकरच फर्ग्युसनला स्वत:चे पदवी प्रमाणपत्र देता येईल. त्यासाठीच्या शिक्षण संस्थांच्या यादीत फर्ग्युसनचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना फर्ग्युसनचे पदवी प्रमाणपत्र मिळू शकेल, असेही माने यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Faculty recruitment policy in autonomous colleges of the state soon pune print news amy

Next Story
पुणे : अकरावी प्रवेशांची दुसरी यादी उद्या
फोटो गॅलरी