“…पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही” ; फडणवीसांचं विधान!

पुणे शहर भाजपाच्या नवीन वास्तूमधील मध्यवर्ती कार्यालयाचे केले उद्घाटन

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे शहर भाजपाच्या नवीन वास्तूतील मध्यवर्ती कार्यालयाचे आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यानंतर त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना, पुणे शहाराच्या पाणी कपातीच्या मुद्द्य्यावर देखील प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, शुक्रवारपासून त्याची कार्यावाही पोलीस बंदोबस्तात केली जाणार आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार असून अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी, “पुण्याचं पाणी कमी करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. जो पुण्याचं पाणी कमी करेल, पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही.” असं बोलून दाखवलं.

तर, या अगोदर माध्यमांशी बोलताना फडणीस म्हणाले, “भाजपा पुणे महानगराच्या नवीन कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे. ज्याप्रमाणे आमचे महापौर हे स्मार्ट सिटी तयार करत आहेत, त्याचप्रमाणे आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी एक लोकाभिमूख परंतु स्मार्ट कार्यालाय पुण्यात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि एक प्रभावी भाजपा तयार करण्यासाठी या ठिकाणी सुरू केलं आहे. हे कार्यालय भाजपाचं असलं, तरी हे जनतेचं कार्यालय असणार आहे. आमचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे या कार्यलायात सातत्याने उपस्थित असणार आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपा पुणे शहरात, अतिशय विक्रमी अशा जागा पुन्हा एकदा महापालिकेत निवडून आणेल, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो.”

“ज्यांच्यावर आरोप झाले, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची हिंमत दाखवा” ; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा!

तसेच, या उद्घाटन कार्यक्रमासाठी झालेलं शक्तीप्रदर्शन म्हणजे मनपा निवडणुकीचं रणशिंग फुंकणे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतं की कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आम्हाला शक्ती प्रदर्शनाची आवश्यकताच नाही. पण, कार्यकर्त्यांचा उत्साह इतका आहे, की ते या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर जमा झालेले आहेत. जेव्हा आम्ही शक्तीप्रदर्शन करू तेव्हा एवढी लहान जागा आम्हाला पुरणार नाही, त्यासाठी मोठी मैदानं लागतील.”

याचबरोबर, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका लागलेल्या आहेत, काही होऊ घातलेल्या आहेत. यानिमित्त आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात, प्रत्येक विभागाची बैठक सुरू आहे. आज तीच बैठक आम्ही पुणे विभागात घेतली. उद्या आम्ही औरंगाबाद व नाशिक विभागात घेणार आहोत. सगळ्या विभागाच्या बैठका घेऊन, आम्ही याची तयारी पूर्ण केलेली आहे.” अशी माहिती देखील यावेळी फडणवीसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fadnavis reaction on pune water cut msr 87 svk

Next Story
धक्कादायक : युट्युबवरील व्हिडिओ पाहून तीन वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी