scorecardresearch

घराण्यांचे ‘स्वरनायक’ भेटणार दिनदर्शिकेतून!

उत्तर हिंदुस्थानी संगीत परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ‘घराण्यां’ना आपल्या कर्तृत्वाने विशिष्ट झळाळी मिळवून देणाऱ्या संगीतनायकांची ओळख आता दिनदर्शिकेतून होणार आहे.

घराण्यांचे ‘स्वरनायक’ भेटणार दिनदर्शिकेतून!

उत्तर हिंदुस्थानी संगीत परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ‘घराण्यां’ना आपल्या कर्तृत्वाने विशिष्ट झळाळी मिळवून देणाऱ्या संगीतनायकांची ओळख आता दिनदर्शिकेतून होणार आहे. प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी विविध घराण्यांना नावारूपास आणणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांवरील ‘स्वरनायक’ या दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे.
ग्वाल्हेर घराण्यात घडलेले आणि पुन्हा महाराष्ट्रात स्थायिक झालेले पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, ख्यालगायकीत जयपूर घराण्याची निर्मिती करणारे अल्लादिया खाँ, आधुनिक किराणा घराण्याची प्रस्थापना करणारे फैय्याज खाँ आणि अब्दुल करीम खाँ, भेंडीबाजार घराण्याचे निर्माते छज्जू खाँ, नजीर खाँ, खादिम हुसेन खाँ, त्यांच्या शिष्या अंजनीबाई मालपेकर, छज्जू खाँ यांचे पुत्र अमान अली खाँ तसेच पतियाळा घराण्याचे सर्वोच्च गायक म्हणून नावलौकिक मिळवणारे बडे गुलाम अली खाँ हे सर्व कलावंत या कँलेंडरच्या पानांमधून भेटणार आहेत.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी (१२ डिसेंबर) या कॅलेंडरचे प्रकाशन होणार असून ‘सवाई’च्या प्रांगणातील दालनात त्याची सवलतीच्या दरात विक्री केली जाणार असल्याचे पाकणीकर यांनी कळवले आहे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या