scorecardresearch

उसाच्या पाचटाला आग लावली, शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

शेतातील ठिबक सिंचन पाइप जळाले असून शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

fire
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरात एका शेतातील उसाच्या पाचटाला अज्ञाताने आग लावली. आगीत उसाला पाणी देण्यासाठी बसविण्यात आलेले शेतातील ठिबक सिंचन पाइप जळाले असून शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत संभाजीराव कुंजीर (वय ७३. रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुंजीर यांची थेऊर परिसरातील जाधव वस्ती येथे शेती आहे. कुंजीर यांनी उस लागवड केली आहे. उसाला पाणी देण्यासाठी कुंजीर यांनी ठिबक सिंचन केले होते. उस साखर कारखान्यात पाठविण्यात आल्यानंतर कुंजीर यांच्या शेतात पाचट होते. मध्यरात्री अज्ञाताने पाचटाला आग लावली. आगीत पाचट जळाले तसेच दीड लाख रुपयांचे ठिबक सिंचनाचे प्लास्टिक पाइप जळाले. पोलीस हवालदार जगताप तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 12:09 IST

संबंधित बातम्या