शेतक-यांच्या प्रश्नांसाठी झटणारे  नेते शरद जोशी यांचे वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी सकाळी ९ वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवासांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
शेतकऱयांच्या प्रश्नावर लढणारे झुंझार नेते म्हणून शरद जोशी यांची ओळख होती. ३ सप्टेंबर १९३५ रोजी सातारा येथे जन्म झालेल्या शरदरावांचे प्राथमिक शिक्षण बेळगावला झाले तर मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमधून त्यांनी एमकॉम केले. बँकिंग या विषयासाठी त्यांना सी. रँडी सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि तेव्हापासून ‘शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू, दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व केले. शरद जोशींचे सर्वात मोठे यश म्हणजे ‘शेतकरी तितका एक एक’ हा नारा देऊन त्यांनी शेतकरी समाजाला जात, धर्म, प्रांत, भाषा हे भेद विसरायला शिकवलं होतं. १९८० साली नाशकात कांदा आणि ऊस दराप्रश्नी शेतकरी संघटनेला घेऊन ते रस्त्यावर उतरले आणि शरद जोशी हे नाव घराघरात पोहोचल. शरद जोशी हे २००४ ते २०१० या काळात राज्यसभेचे सदस्य होते.   शेतकऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला असून, शेतकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे.
साहेबांची एक मुलगी अमेरिकेत आहे. तर दुसरी कॅनडा या देशात आहे. त्यामुळे शेतक-यांनी पुण्याकडे येण्याची घाई करु नये. शरद जोशींवर अंत्यसंस्कार कधी आणि कुठे होणार हे उद्या संध्याकाळी जाहीर करू असे शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे प्रश्न हिरीरीने मांडणारा चळवळीतील कार्यकर्ता, शेती अर्थव्यवस्थेला जागतिक व्यासपीठावर मार्गदर्शन करणारा आणि चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारा नेता, श्री शरदजी जोशी यांच्या निधनाने आपण गमावला आहे. शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळावी आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध व्हावी, यासाठी त्यांचे समर्पित जीवन आणि संघर्ष कायम स्मरणात राहील. माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शेतकऱ्यांचे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपले सरकार कायम प्रयत्नशील आणि वचनबद्ध असेल. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मी आज जो आहे, तो शरद जोशींमुळे. साखरसम्राटांच्या नजरेला नजर भिडवण्याचे सामर्थ्य त्यांच्यामुळे आले. शरद जोशींशी उद्या नागपुर येथे भेट ठरली होती, परंतु दुर्दैवाने ती अपुरी राहिली – खासदार राजू शेट्टीं

शरद जोशी यांचा जीवनपट
जन्म    :    ३ सप्टेंबर १९३५
जन्मस्थान    :    सातारा
वडील    :    स्व. अनंत नारायण जोशी
आई    :    स्व. इंदिरा अनंत जोशी
पत्नी    :    लीला (१९४३ – १९८२)
कन्या    :    सौ. श्रेया शहाणे (कॅनडा)
डॉ. गौरी जोशी (न्यू जर्सी, अमेरिका)
शिक्षण
प्राथमिक    :    रजपूत विद्यालय, बेळगाव
माध्यमिक    :    रुंगठा हायस्कूल, नाशिक व पार्ले-टिळक विद्यालय, विलेपार्ले (मुंबई)
एस.एस.सी    :    १९५१
बि.कॉम    :    १९५५, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई<br />एम.कॉम    :    १९५७, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
सुवर्णपदक    :    बॅंकिंग विषयासाठी सी. रॅंडी सुवर्णपदक
IPS    :    IPS (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण, १९५८
खासदार    :    राज्यसभेचे सदस्य
व्यवसाय
*    कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथे अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विषयाचे व्याख्याता, १९५७-१९५८
*    भारतीय टपाल सेवा, Class I अधिकारी. १९५८-१९६८
पिनकोड यंत्रणेच्या पायाभरणीत प्रवर्तक सहभाग.
*    Chief, Informatics Servise, International Bureau, UPU
(Universal Postal Union), Bern, Switzerland 1968-1977
*    शेती व वर्तमानपत्रीय स्तंभलेखन १९७७ पासून आजतागायत
संघटना कार्य
*    मुलभूत उद्देश : व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीत
कमी करणे
*    शेतकरी संघटनेची स्थापना : १९७९
९ ऑगष्ट १९७९ रोजी चाकण येथे संघटनेच्या कार्यालयाचा शुभारंभ
*    १९७९ पासून ’शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा,उस, तंबाखू,
दूध, भात, कापूस, इत्यादी पिकांच्या शेतकरी आंदोलनाचे नेत्वृत्व, त्यासाठी वारंवार
उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने
*    देशभरातील शेतकर्‍यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना :
३१ ऑक्टोंबर १९८२
*    महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान,
कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यात शेतकरी आंदोलने
स्त्री प्रश्नांची मांडणी
*    चांदवड (जि.नाशिक) येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला
अधिवेशन.  अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती.
*    स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूषमुक्ती
*    शेतकरी महिला आघाडीची स्थापना
*    महिलांच्या राजकीय सहभागाची योजना
*    महिलांच्या संपत्ती अधिकाराची फ़ेरमांडणी
*    ’लक्ष्मीमुक्त’ अभियानाद्वारे स्त्रियांच्या नावे शेती करण्याचे, शेतकरी पुरूषांना
आवाहन (१९८९). प्रतिसादस्वरूप १९९१ पर्यंत लाखांवर स्त्रियांची नावे
जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर नोंदविली गेली.
*    दारूदुकानबंदी आंदोलन
*    पंचायत राज्य बळकाव आंदोलन
संस्थात्मक कार्य
*    संस्थापक अध्यक्ष
*    कृषि-योगक्षेम संशोधन न्यास
*    चाकण शिक्षण मंडळ
*    शिवार अ‍ॅग्रो प्रॉडक्टस लि.
*    भामा कन्स्ट्रक्शन्स लि.
राजकीय कार्य
*    स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी ’स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना (१९९४)
*    देशाची राजकीय,आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता
मांडणारा व त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच
न दाखविणारा किंबहुना, मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा
निवडणूक जाहीरनामा
*    स्वतंत्र भारत पक्षाचे खासदार (राज्यसभा) जुलै २००४ ते जुलै २०१०
विशेष पदनियुक्ती
*    अध्यक्ष, स्थायी कृषि सल्लागार समिती, भारत सरकार (१९९० ते १९९१)
कॅबिनेट दर्जा. “राष्ट्रीय कृषिनीती ” चा मसुदा
*    राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य १९९० पासून
*    स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आयोजन समितीचे सदस्य१९९७
*    अध्यक्ष, कृषिविषयक कार्यबल, भारत सरकार (सप्टेंबर २००० ते जुलै २००१).
कॅबिनेट दर्जा. जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात देशाची अर्थनिती,
विशेषत: कृषिनीती कशी असावी याची शिफ़ारस करणारा अहवाल
*    २००४ ते १० या खासदारकीच्या काळात संसदेच्या १६ विविध समित्यांचे सदस्य
जागतिक स्तर
*    जागतिक कृषिमंच (World Agriculture forum)  सेंट लुई (अमेरिका) च्या
सल्लागार मंडळाचे सदस्य १९९९ पासून.
*    अर्थव्यवस्था, शेतीमाल व्यापार इत्यादी विषयांवरील परिसंवाद परिषदांसाठी
नियमित निमंत्रित.
लिखान/संपादन
*    शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ’वारकरी’ चे संपादक व प्रमुख लेखक
*    ’शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाची हिंदी, गुजराती,
कन्नड व तेलगू भाषांतरे,
*    द टाईम्स ऑफ़ इंडिया, बिझिनेस इंडिया, संडे, द हिंदु बिझिनेस लाइन, लोकमत
त्यादी नियतकालिकांमध्ये , दैनिकांमध्ये स्तंभलेखन,
*    शेतकरी संघटनेच्या ’शेतकरी संघटक’ या पाक्षिक मुखपत्रासाठी २८ वर्ष व
’आठवड्याच्या ग्यानबा’ या साप्ताहिकासाठी २ वर्ष नियमित लेखन
पुरस्कार
१    सातारा भूषण: रा.ना.गोडबोले चॅरिटेबल ट्रस्ट तर्फ़े ११ वा सातारा भूषण पुरस्कार २०१०
२    महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार २०१०: ’अंगारमळा’ या पुस्तकासाठी
३    Agriculture Today या मासिकातर्फ़े दिला जाणारा पहिला
Agriculture Leadership Award 2008
४    चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई ’जीवनगौरव पुरस्कार २०११’
संशोधन मार्गदर्शन
*    तिसर्‍या जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा
विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या
शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी, अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी
भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले.
ठळक नोंदी ’इंडिया-भारत’
*    १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामंतर देशाच्या सरकारने शेतकर्‍यांच्या
शोषणाची इंग्रज सरकारची वसाहतिक नीती चालूच ठेवली. त्यामुळे देशाच्या
जनतेमध्ये आधी आर्थिक व अनुषंगाने सामाजिक, सांकृतिक व मानसिक व्दैत तयार
झाले हे व्दैत अधोरेखित करणार्‍या  ’इंडिया-भारत’ संकल्पनेचे उद्गाते
*    विकसित देशांत शेती चालू राहण्यासाठी शेतकर्‍यांना भरघोस अनुदाने दिली जातात.
भारतात मात्र शेतकर्‍यांना उणे अनुदान दिले जाते, हे सप्रमाण सिद्ध केले.
शरद जोशी यांची ग्रंथसंपदा
१    शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
२    प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
३    चांदवडची शिदोरी – स्त्रियांचा प्रश्न
४    शेतकर्‍यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
५    स्वातंत्र्य का नासले?
६    खुल्या व्यवस्थेकडे – खुल्या मनाने
७    अंगारमळा
८    जग बदलणारी पुस्तके
९    अन्वयार्थ – १,२
१०    माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
११    बळीचे राज्य येणार आहे
१२    अर्थ तो सांगतो पुन्हा
१३    पोशिंद्याची लोकशाही
१४    भारतासाठी
१५    राष्ट्रीय कृषिनीती
इंग्रजी ग्रंथसंपदा
1    Answering before God
2    The Women’s Question
3    Bharat Eye view
4    Bharat Speaks Out
5    Down To Earth

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
Sunetra Pawar campaign started at Maruti Mandir in Kanheri in Baramati.
विकास त्यांनीच केला काय? बारामतीमधील कामांवरून अजित पवार यांचा सवाल; शरद पवार यांच्यावर टीका
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”