|| राहुल खळदकर

उत्तरेकडील राज्यात मोहरी लागवडीत वाढ

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
lal killa challenge for bjp in lok sabha elections 2024
लालकिल्ला : भाजप आर की पार?
25 seats in North East are challenging for BJP
ईशान्येकडील २५ जागा भाजपसाठी आव्हानात्मक
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

पुणे : स्वयंपाकघरातील फोडणी यंदाच्या हंगामात स्वस्त होणार आहे. उत्तरेकडील राज्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात मोहरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केल्याने उत्पादन जास्त होणार आहे. परिणामी यंदाच्या हंगामात मोहरीचे प्रतिकिलोचे दर ५५ रुपयांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात मोहरीचे दर ८० रुपये प्रतिकिलो असे होते.

मोहरीची सर्वात जास्त लागवड उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, गुजरातमधील शेतकरी करतात. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान या राज्यांत मोहरीपासून (सरसो) करण्यात आलेल्या तेलाचा वापर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. त्या तुलनेत देशातील अन्य भागात शेंगदाणा, सूर्यफुलापासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर केला जातो. उत्तरेकडील वातावरण थंड आहे. मोहरी उष्ण असल्याने उत्तरेकडील राज्यात मोहरीपासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर केला जातो, असे गुजरातमधील उंजा तसेच पुण्यातील मार्केटयार्डातील मोहरीचे व्यापारी रमेश पटेल यांनी  सांगितले.

 मोहरीचा हंगाम  १५ फेब्रुवारीनंतर सुरू होतो. गुजरातमधील अहमदाबादपासून जवळ असलेले उंजा मोहरीचे प्रमुख विक्री केंद्र आहे. तेथील व्यापारी जिरे, मोहरीची खरेदी करतात. तेथून देशभरातील बाजारपेठेत मोहरी विक्रीस पाठविण्यात येते. यंदाच्या हंगामात उत्तरेकडील राज्यातील शेतकऱ्यांनी मोहरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली असून मोहरीचे लागवड क्षेत्र अडीच ते तीन पटीने वाढले आहे. यंदाच्या हंगामात मोहरीचे उत्पादन वाढणार असून परिणामी दरातही मोठी घट होणार असल्याचे पटेल यांनी नमूद केले.   पोलंडमध्ये भारतीय मोहरीला मागणी

युरोप, आखाती देश तसेच पोलंडमध्ये भारतातून पिवळी मोहरी (यलो मस्टर्ड) विक्रीस पाठविली जाते. पोलंडमध्ये पिवळ्या मोहरीपासून बटर तयार केले जाते. मोहरी उष्ण असल्याने युरोपियन देशातून मागणी जास्त आहे, असे  व्यापारी रमेश पटेल यांनी सांगितले.

मोहरीचा नवीन हंगाम १५ फेब्रुवारीनंतर सुरू होणार आहे. उत्तरेकडील राज्यात मोहरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जानेवारी महिन्यात मोहरीचे निर्यातीचे सौदे (एक्सपोट किंवा फॉरवर्ड सौदे) सुरू केले असून सध्या ५५ रुपये प्रतिकिलो दराने निर्यातीचे सौदे सुरू आहेत.

-रमेश पटेल, वीरल अ‍ॅग्रोटेक, मोहरी व्यापारी, उंजा, गुजरात