scorecardresearch

पुणे: स्वतःच्याच ११ वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार; सख्ख्या आईनेच केली मुलाविरोधात तक्रार

आजीने पीडित नातीला काही झालं आहे का? असे विचारले असता वडील घाणेरडे वागत असल्याचं तिने आजीला सांगितले.

Rape, Crime, Pune Crime,

पुण्यातल्या हिंजवडीत अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी वडिलाने दोन वेळेस मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय आरोपी वडील, पीडित ११ वर्षीय मुलगी आणि मुलगा असे तिघे जण एकत्र राहात होते. आरोपीचे पत्नीसोबत पटत नसल्याने पत्नी तीन वर्षांपासून वेगळी राहते. मुलं मात्र वडिलांसोबत हिंजवडी परिसरात राहत होते.


दरम्यान, १३ मार्च ला पहिल्यांदा सकाळी अल्पवयीन मुलीवर वडिलांनी जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केले, तर दुसऱ्या दिवशी देखील म्हणजे १४ मार्चला पुन्हा तिच्या एकटेपणाचा फायदा घेत अत्याचार केले. या घटनेमुळे पीडित मुलगी घाबरली होती. मात्र, मन मोकळं करण्यास तिच्या सोबतीला कोणी नव्हतं. 

दरम्यान, धुळवड आणि होळी आल्याने पीडित मुलगी आणि मुलगा यांना आरोपीने आजीकडे गावी सोडले. होळी आणि धुळवड झाली तरी पीडित मुलगी घरी जायचं नाव घेत नव्हती. आजीने पीडित नातीला काही झालं आहे का? असे विचारले असता वडील घाणेरडे वागत असल्याचं तिने आजीला सांगितले. या प्रकरणी सख्ख्या मुलाच्या विरोधात आईने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, ३५ वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father sexually exploited his own minor daughter grandmother filed complaint in pune vsk 98 kjp