scorecardresearch

Premium

आळेफाटा येथील रहिवासी सोसायटीत बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सावज शोधत असताना बिबट्या आल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे.

Fear among citizens Leopards roaming residential society Alephata narayangao pune
आळेफाटा येथील रहिवासी सोसायटीत बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नारायणगाव: आळेफाटा (ता. जुन्नर) येथील सिद्धिविनायक या गजबजलेल्या सोसायटीमध्ये सावजाच्या शोधात आलेल्या बिबट्याचे दर्शन घडल्याने एकच खळबळ उडाली. सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या आल्याचे स्पष्ट झाले आहे. सावज शोधत असताना बिबट्या आल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे.

जुन्नर तालुक्यात बिबट्याचे दर्शन हे जुन्नरकरांना नवीन नाही. मात्र, भरवस्तीत बिबट्या दिसू लागल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मंगळवारी (२८ नोव्हेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास आळेफाटा परिसरातील सिद्धिविनायक सोसायटी बिबट्या सावजाच्या शोधात थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरला. सोसायटीला कंपाउंड नसल्याने रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री त्या ठिकाणी बसतात.

dene samajache marathi news, dene samajache initiative pune marathi news
स्वयंसेवीक्षेत्राला पाठबळ देणारा ‘देणे समाजाचे’ उपक्रम!
How effective is lidar survey Taxation of constructions in Gavthan and CIDCO colonies as before
‘लिडार’ कितपत प्रभावी? गावठाण, सिडको वसाहतींमधील बांधकामांना पूर्वीप्रमाणेच कर आकारणी
Controversy in Ambad
अतिक्रमित प्रार्थनास्थळ हटवल्याने अंबडमध्ये वाद
Lack of fitness
शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्तीचा अभाव, सर्वेक्षणातील निष्कर्ष चिंताजनक

हेही वाचा… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पुण्यात आगमन

बिबट्याला पाहून कुत्री जिन्यांवरून टेरेसवर पळाली. बिबट्याही त्यांच्या पाठीमागे जिन्यांच्या पायऱ्या वर चढत गेला खरा. परंतु, टेरेस न सापडल्याने बिबट्या पुन्हा खाली आला. बिबट्या सोसायटीमध्ये आल्यावर कुत्र्यांनी भुंकण्यास सुरवात केली. परंतु, ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे कोणालाही जाग आली नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या सोसायटीत दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fear among citizens due to leopards roaming in residential society in alephata narayangao pune print news vvk 10 dvr

First published on: 29-11-2023 at 18:36 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×