उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि कु लगुरूंच्या बैठकीत निर्णय

पुणे : राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांसाठी शुल्कामध्ये सवलत मिळणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या कु लगुरूंसह शुल्कासंदर्भात बैठकीमध्ये के लेल्या चर्चेनंतर शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सवलत किती असेल ते मंगळवारी (२८ जून) जाहीर करण्यात येईल. शुल्क सवलतीच्या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

बैठकीनंतर सामंत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये गेल्यावर्षीपासून बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक कामकाज करण्यात येत आहे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू के लेल्या निर्बंधांमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाविद्यालये बंद असल्याने ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना अशा सुविधांचा वापर होत नसल्याने या सुविधांचे शुल्क न घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कु लगुरूंची बैठक घेऊन शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सवलत दोन वर्षांसाठी हवी

सामंत यांनी के लेल्या ट्विटनुसार २०२१-२२ या वर्षांसाठी शुल्क सवलत दिली जाणार आहे. मात्र करोनामुळे गेल्यावर्षीपासूनच आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन्ही वर्षांच्या शुल्कामध्ये सवलत देण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.