Premium

पुणे: भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू; दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी

अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. या प्रकरणा पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव अधिक तपास करत आहेत.

fellow passenger on two wheeler dies after being hit by speeding
प्रतिनिधिक छायाचित्र : फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

fellow passenger on two wheeler dies after being hit by speeding vehicle pune print news rbk 25 zws 70 | पुणे: भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू; दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. अथर्व दत्तात्रय गजरे (वय २०, रा. वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार ओम लोणकर (वय २१, रा. वाघोली, नगर रस्ता) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> पुणे मेट्रोत चोरट्यांनी केली अजब चोरी

याबाबत ओम लोणकर याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार ओम आणि त्याचा मित्र अथर्व लोणीकंद-केसनंद रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. या प्रकरणा पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव अधिक तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fellow passenger on two wheeler dies after being hit by speeding vehicle pune print news rbk 25 zws