पुणे : दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिसाला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना वारजे भागात घडली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे :दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाचा खून; लोणी काळभोरमधील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे दोन दिवसांपूर्वी सायंकाळी वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमांचा भंग केला. विरुद्ध दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार महिलेला पोलीस शिपाई तांबे यांनी अडवले. दुचाकीस्वार महिलेवर कारवाई करताना तिने पोलीस शिपाई तांबे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तांबे यांनी सहकारी महिला पोलीस शिपाई चव्हाण यांना घटनेची माहिती दिली. पोलीस शिपाई चव्हाण तेथे आल्या. तेव्हा तांबे आणि चव्हाण यांना शिवीगाळ करुन दुचाकीस्वार महिलेने पुन्हा धक्काबुक्की केली. झटापट करुन दुचाकीस्वार महिला पसार झाली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female police officer assaulted by woman on bike pune print news rbk 25 zws