एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. हर्षदा बाळासाहेब दगडे असे निलंबित केलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदाराच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचाराच्या दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी; तसेच आई-वडील, बहिणीला अटक न करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा दगडे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी दगडे यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दगडे यांनी केलेले वर्तन बेजबाबदार, पोलीस दलाची प्रतिमा करणारे असल्याचे उघड झाल्याने पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दगडे यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द
megha engineering 60 percent donation to bjp
Electoral Bonds Data : ‘मेघा इंजीनियरिंग’ची ६० टक्के देणगी भाजपला; रोखे खरेदी केल्यानंतर सरकारी कंत्राटे