पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० फेब्रुवारीला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. परीक्षा देण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येतील.

शासनमान्य शाळांमधून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांत पाचवीच्या विद्यार्थ्यांना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विद्यानिकेतन परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन परीक्षा आणि शासकीय विद्यानिकेतन परीक्षा, तसेच आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता येईल.

परीक्षा अर्ज आणि अधिक माहिती http://www.mscepune.in  आणि https://mscepuppss.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. २० फेब्रुवारीला राज्यात एकाच वेळी सर्व जिल्ह्यात परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fifth eighth scholarship examination february ysh

ताज्या बातम्या