पुण्यात समाजमाध्यमावरील ओळखीतून ज्येष्ठ महिलेची ५७ लाखांची फसवणूक |fifty seven lakh fraud with elder women social media cyber crime sinhgad pune | Loksatta

पुण्यात समाजमाध्यमावरील ओळखीतून ज्येष्ठ महिलेची ५७ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी परदेशातून ज्येष्ठ महिलेला दोन कोटी रुपये पाठविण्याचे आमिष दाखविले होते. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात समाजमाध्यमावरील ओळखीतून ज्येष्ठ महिलेची ५७ लाखांची फसवणूक
( संग्रहित छायचित्र )/लोकसत्ता

पुणे : समाजमाध्यमावरील ओळखीतून सिंहगड रस्ता भागातील ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी ५७ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सायबर चोरट्यांनी परदेशातून ज्येष्ठ महिलेला दोन कोटी रुपये पाठविण्याचे आमिष दाखविले होते. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. त्या वेळी एका चोरट्याने त्याचे नाव एरिक ब्राऊन असे सांगितले होते. परदेशात वास्तव्यास असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. ज्येष्ठ महिलेला परदेशातून दोन कोटी रुपये भेट म्हणून पाठविण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

त्यानंतर ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर आशा कुमारी नावाच्या महिलेने संपर्क साधला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याची बतावणी तिने केली. रिझर्व्ह बँकेशी साधर्म्य असलेला ईमेल महिलेला पाठविण्यात आला. ज्येष्ठ महिलेला आमिष दाखवून तिला वेळोवेळी ५७ लाख ७९ हजार ३०० रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.दरम्यान, महिलेला दोन कोटी रुपयांची रक्कम पाठविण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत.

हेही वाचा : पुणे : सहकारनगर भागात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेकडून अटक

आमिषाचे जाळे

गेल्या काही वर्षांपासून समाजमाध्यमातून अनोळखी व्यक्तीशी झालेल्या मैत्रीतून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अनोळखी व्यक्तीने मैत्रीची विनंती पाठविल्यानंतर त्याला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी वेळोवेळी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे काणाडोळा करुन अनेकजण आमिषांना बळी पडत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे जिल्ह्यात १०३ जणांना नव्याने करोना संसर्ग

संबंधित बातम्या

पुणे : पदवी प्रथम वर्ष प्रवेशांबाबत बीएमसीसीला नोटिस; महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह
तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे हेलिकॉप्टर बारामतीच्या शेतात; आपत्कालीन स्थितीत उतरविले, कोणालाही इजा नाही
PMC Election Result 2017: हे आहेत पुण्यातील विजयी उमेदवार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत
FIFA World Cup 2022 : गोलफरकामुळे मेक्सिकोचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
कास पठाराला घातलेले कुंपण काढण्यास सुरुवात
केंद्राने देशभर समान नागरी कायदा लागू करावा!; शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत : राज
विश्लेषण : रॉय दाम्पत्याचे काय चुकले?