scorecardresearch

पुणे: हाॅटेलमध्ये हाणामारी; १३ जणांच्या विरोधात गुन्हा; वारजे भागातील घटना

वारजे भागातील एका हाॅटेलमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या असून १३ जणांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे: हाॅटेलमध्ये हाणामारी; १३ जणांच्या विरोधात गुन्हा; वारजे भागातील घटना
( संग्रहित छायचित्र )

पुणे: वारजे भागातील एका हाॅटेलमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या असून १३ जणांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वारजे भागातील चांदणी बार‌ अँड रेस्टाॅरंटचे व्यवस्थापक डॅनी अमृत बहाद्दुर सुब्बा (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वारजे पोलिसांनी प्रसाद गजानन ‌ढमाले, शिवराज चव्हाण, बाबू दासराज, स्वराज भोसले, ओंकार कांगणे, ओंकार फाटक, श्रवण पवार यांच्यासह दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी हाॅटेलच्या सुरक्षारक्षकास मारहाण केली; तसेच खुर्च्याची तोडफोड केली. सुब्बा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी काचेचा ग्लास डोक्यात मारल्याचे सुब्बा यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

दरम्यान, या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद शिवाजी संजय चव्हाण (वय २६, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर) याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चांदणी बारचे व्यवस्थापक डॅनी सुब्बा, चंदन पासवान, विकास कुमार यादव, अरनजीत सिब चोपाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी चव्हाण आणि मित्र बारमध्ये दारू प्यायला बसले होते. त्या वेळी ओंकार कांगणे आणि हाॅटेलच्या सुरक्षारक्षकात वाद झाला. हाॅटेलमधील कामगार आणि व्यवस्थापक डॅनी सुब्बा याने शिवागीळ करुन डोक्यात काचेचा ग्लास मारला, असे चव्हाण यांनी परस्पर विरोधी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक होळकर तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 11:00 IST

संबंधित बातम्या