येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी ; मित्राला मारल्याच्या कारणावरुन कैद्याला मारहाण

येरवडा कारागृहात दोन कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

jail
( संग्रहित छायचित्र )

पुणे : येरवडा कारागृहात दोन कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून दोन कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुल रेवणसिद्ध कांबळे आणि सुशांत सुरेश शिंदे (दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. याबाबत अजय उर्फ पपड्या शामराव सोनवणे (वय २४, रा. गेवराई, बीड) याने फिर्याद दिली आहे. सोनवणे सकाळी आंघोळीसाठी गेला होता.

त्या वेळी तू आमच्या मित्राला का मारले, अशी विचारणा कांबळे आणि शिंदेने त्याच्याकडे केली. दोघांनी सोनवणेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच सोनवणेला दगड फेकून मारला. येरवडा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fight in yarwada jail as a prisoner beats up a friend pune print news amy

Next Story
पुणे : राज्यभरातील शाळांमध्ये आता आनंददायी अभ्यासक्रम ; रोज परिपाठानंतर विविध उपक्रम
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी