scorecardresearch

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी ; पाणी भरण्याच्या वादातून दोघांना मारहाण

येरवडा कारागृहात पिण्याचे पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून दोन कैद्यांना सिमेंटच्या पत्र्याने मारहाण करण्यात आली

येरवडा कारागृहात पिण्याचे पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून दोन कैद्यांना सिमेंटच्या पत्र्याने मारहाण करण्यात आली. या घटनेत दोन कैदी जखमी झाले असून मारहाण प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. टिकलसिंह गब्बरसिंह, अजिनाथ लक्ष्मण गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. दोघांनी केलेल्या मारहाणीत कैदी सोनू शेटे, किशोर मंजुळे जखमी झाले आहेत. कारागृह अधिकारी अभिजीत यादव यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक एक कार्यालयासमोर कैदी टिकलसिंह, अजिनाथ गायकवाड यांचा सोनू शेटे, किशोर मंजुळेशी वाद ‌झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोघांनी सिमेंटच्या पत्र्याने शेटे आणि मंजुळेला मारहाण केली.
शेटे आणि मंजुळेवर उपचार करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक शेलार तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fighting among inmates yerawada jail two were beaten over argument over water pune print news amy