scorecardresearch

निराधारांच्या निवाऱ्यासाठी आर्थिक मदतीची गरज; ‘रिअल लाईफ रिअल पीपल्स’

निराधार रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी दीड-दोन दशकांपूर्वी एम. ए. हुसेन यांनी वैयक्तिक पातळीवर सुरू केलेल्या कार्याला आता ‘रिअल लाईफ रिअल पीपल्स’ संस्थेच्या रूपाने संस्थात्मक जोड मिळाली आहे.

निराधारांच्या निवाऱ्यासाठी आर्थिक मदतीची गरज; ‘रिअल लाईफ रिअल पीपल्स’

पुणे : निराधार रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी दीड-दोन दशकांपूर्वी एम. ए. हुसेन यांनी वैयक्तिक पातळीवर सुरू केलेल्या कार्याला आता ‘रिअल लाईफ रिअल पीपल्स’ संस्थेच्या रूपाने संस्थात्मक जोड मिळाली आहे. निराधारांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी संस्थेला दानशूरांकडून मदतीचा हात हवा आहे.

पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील गरजू रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्यापासून हुसेन यांचे काम सुरू झाले. मात्र, अनेक निराधार रुग्णांची परवड होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हळूहळू कार्यविस्तार केला.  पिंपरी-चिंचवड पालिकेनेही त्यांच्या कामाला हातभार लावत रुग्णालयात संस्थेच्या कामासाठी जागा उपलब्ध करून दिली.

संस्थेच्या निवारा केंद्रात सध्या ५५ निराधार व्यक्ती वास्तव्यास आहेत. त्यासाठी महिन्याला साडेतीन ते चार लाख रुपयांचा खर्च येतो. दुर्धर आजारातून बरे होऊनही काही कुटुंबे रुग्णांना स्वीकारत नाही. अशा अधिकाधिक निराधारांच्या निवासाची सोय करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेने राजगुरुनगर येथे मोठय़ा केंद्रासाठी जागा खरेदी केली आहे. तिथे निराधारांसाठी निवारागृह उभे करायचे असल्याने दात्यांनी मदत करावी, असे आवाहन हुसेन यांनी केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Financial assistance shelter destitute real life real people ysh

ताज्या बातम्या