पुणे : पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना तीन हजार चारशे रुपये ‘गुगल पे’ वरून ट्रान्सफर करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. अशीच आर्थिक फसवणूक भाजपाच्या अन्य तीन महिला आमदारांची झाल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार माधुरी मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या “आम्ही अनेक नागरिकांना नेहमी मदत करत असतो. त्याचप्रमाणे मुकेश राठोड या व्यक्तिचाही फोन आला. त्यांच्या विनंतीवरुन मी त्यांना आर्थिक मदत केली. दरम्यान मुंबईमध्ये पक्षाची बैठक होती. त्यावेळी माझ्या सोबत असलेल्या सहकारी आमदार मेघना बोर्डीकर साकोरे,आमदार देवयानी फरांदे, आमदार श्वेता महाले यांच्यांशी मदत विषयावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी मुकेश राठोड हे नाव पुढे आले आणि अशीच रक्कम त्यांच्याकडे देखील मागितल्याचे सर्वांनी सांगितले. या चार घटना लक्षात घेता त्याने अनेकांना फसवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे”.

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Thane Lok Sabha
कोणताही उमेदवार द्या पण, तो शिवसेनेचाच असावा; नवी मुंबईतील शिबिरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लावला सूर
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता

बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरी मिसाळ यांची कन्या पुजा मिसाळ यांनी या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांना मुकेश राठोड या व्यक्तीने १२ जुलैला फोन केला होता. माझ्या आईच्या औषधा करीता तीन हजार चारशे रूपयांची गरज आहे असं सांगत हे पैसे ‘गुगल पे’ द्वारे ट्रान्सफर करण्याची वारंवार मागणी राठोडने केली. त्यानंतर त्यांनी ते पैसे ‘गुगल पे’ द्वारे ट्रान्सफर केल्याची माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे. मुकेश राठोड (वय ३५) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.