scorecardresearch

पुणे : विडी कामगारांच्या भूखंडाची परस्पर विल्हेवाट लावून म्हाडाची फसवणूक, आठ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यात खराडी भागातील महाराष्ट्र गृहरचना महामंडळाचा (म्हाडा) भूखंड विकसित करण्याबाबत म्हाडाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संग्रहित छायाचित्र

पुण्यात खराडी भागातील महाराष्ट्र गृहरचना महामंडळाचा (म्हाडा) भूखंड विकसित करण्याबाबत म्हाडाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी म्हाडाची कोणतीही परवानगी न घेता भूखंडाची विल्हेवाट लावली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत म्हाडाचे अधिकारी विजय शंकर ठाकूर (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी मे. अंबा लँडमार्क प्रा. लि.चे विजयकुमार मेहता, दिलीप काळे, संताजी पाटील, किशोर पोरवाल, पंकज सामल, नानासाहेब आबनावे, महंमद इनामदार, ललितकुमार यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे खराडी गाव येथे सर्व्हे क्रमांक ३७/१/१ येथे म्हाडाचा भूखंड आहे. संबंधित भूखंड म्हाडाकडून विडी कामगारांसाठी देण्यात आला होता. सन २००० मध्ये भूखंड धारकांनी विश्वकर्मा विडी कामगार सहकारी गृहरचना सोसायटीची स्थापन केली. त्यांनी भूखंड मे अंबा लँडमार्क प्रा. लि चे मेहता व काळे यांना विकसित करण्यासाठी दिला. त्यांनी अन्य आरोपींशी संगनमत केले.

हेही वाचा : शहरी पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांवर आता म्हाडाचे नियंत्रण

म्हाडाची कोणतीही परवानगी न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी म्हाडाचे नाव तसेच बोधचिन्हाचा वापर केला. म्हाडाच्या मिळकतीची परस्पर विल्हेवाट लावणे तसेच अन्य व्यक्तींचे हक्क निर्माण करण्याच्या उद्देशाने म्हाडाची फसवणूक केल्याचे ठाकूर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fir against 8 people for cheating with mhada about land in kharadi pune print news pbs

ताज्या बातम्या