रिक्षा दुरुस्तीचे काम केल्यानंतर पैसे मागणाऱ्या गॅरेज चालकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. या प्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रईस अमीन शेख (वय ३० वर्ष, रा. मानाजी नगर, नवदीप सोसायटी, नऱ्हे, पुणे) असे बेदम मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या गॅरेज चालकाचे नाव आहे.

हेही वाचा >>> पुणे: छेड काढणाऱ्याच्या डोळ्यात विद्याथिर्नीने टाकली मिरची पूड

Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी नौशाद फारुख शेख, अल्ताफ शेख, झरीना शेख, आमीना शेख यांच्या विरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रईस शेख यांनी शेजारी राहणारा नौशाद याच्या रिक्षाची दुरुस्ती केली होती. रईस आणि त्याचा भाऊ अनिस यांनी नौशाद याच्याकडे पैशांची मागणी केली होती. नौशादने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने रईस आणि त्याचा भाऊ अनिस नौशादच्या घरी गेली होते. त्या वेळी नौशाद आणि रईस यांच्यात वादावादी झाली. नौशाद आणि त्याच्या कुटुंबीयांनी रईसला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत रईस बेशुद्ध पडला. बेशुद्धावस्थेतील रईसला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. रईस याचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.