आता इमारतीवरील मोबाईल टॉवर देखील काढून टाकले आहेत. आता घरं देखील पाडणार असल्याची धमकी पुण्यातील दत्तवाडी परिसरातील भाजपचे नगरसेवक आनंद रिठे यांनी एका नागरिकाला दिली. या धमकीमुळे वैतागून या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून भाजपा नगरसेवकाविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दत्तवाडी येथील महादेव इमारतीमध्ये राहणाऱ्या ४६ वर्षीय संजय सुर्वे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. नगरसेवक नगरसेवक आनंद रिठेंनी सुर्वे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

नक्की पाहा >> पुणे : नगरसेवकांनीच मोडले करोना नियम; सोशल डिस्टन्सिंग विसरुन महिलांच्या गप्पा तर पुरुषांना मास्कचा विसर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुर्वे हे दत्तवाडी परिसरात राहत होते. त्यांच्या इमारतीवर एका मोबाईल कंपनीचा टॉवर बसवण्यात आला होता. तुम्ही मला पैसे द्या, अन्यथा मोबाईल टॉवर काढून टाकला जाईल, अशी धमकी भाजप नगरसेवक आनंद रिठे यांनी संजय सुर्वे यांना दिली. रिठेंनी अनेक वेळा पैशांची मागणी करून देखील सुर्वेंनी पैसे दिले नाही. त्यामुळे नगरसेवक असलेल्या रिठे यांनी पुणे महापालिकेत संजय सुर्वे यांच्या इमारतीवरील मोबाईल टॉवर काढून टाकण्यासाठी अर्ज केला. त्यानुसार अधिकार्‍यांच्या परवानगीनंतर हा टॉवर काढून टाकण्यात आला.

टॉवर काढून टाकल्यानंतर रिठेंनी, आता टॉवर काढले असून पुढे घर देखील पाडणार अशी धमकी सुर्वे यांना दिली. रिठे सुर्वेंना अनेकदा घर पाडण्याच्या धमक्या द्यायचे. या मानसिक त्रासाला कंटाळून सुर्वे यांनी दत्तवाडी परिसरातील पौर्णिमा सायकलच्या दुकानात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची दखल पोलिसांनी सुर्वे यांचा मुलगा शशांकने दिलेल्या तक्रारीनंतर घेतली आहे. शशांकने नगरसेवक आनंद रिठेंविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे दत्तवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आनंद रिठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही होऊ शकला नाही.