scorecardresearch

पुण्यात मंगळवार पेठेत ४ ते ५ घरांना आग

अग्निशामक दलाचे ३ बंब आणि २ टॅंकर्सच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली

पुण्यात मंगळवार पेठेत ४ ते ५ घरांना आग
घटनास्थळाचे छायाचित्र

पुण्यातील मंगळवार पेठ भागातील नरपतगिरी चौकाजवळ असलेल्या ४ ते ५ घरांना सोमवारी सकाळी आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा फवारा मारत आग आटोक्यात आणली. आगामध्ये सामानाचे नुकसान झाले असून, कोणालाही दुखापत झालेली नाही. अग्निशामक दलाचे ३ बंब आणि २ टॅंकर्सच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजलेले नाही. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-05-2016 at 12:27 IST

संबंधित बातम्या