scorecardresearch

Premium

VIDEO: अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत; लोखंडी जाळीत अडकलेल्या एक वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका

मुलाच्या आई-वडिलांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे मनाेमन आभार मानले.

Firefighters rescued one-year-old boy stuck grille Sinhagad road area pune
अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत; लोखंडी जाळीत अडकलेल्या एक वर्षांच्या मुलाची सुखरुप सुटका (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

पुणे: सदनिकेतील गॅलरी लावलेल्या लोखंडी जाळीत एक वर्षाचा मुलगा अडकल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळीत अडकलेल्या मुलाची सुखरुप सुटका केली.

हिंगणे खुर्द परिसरात एका सदनिकेच्या जाळीत एक वर्षाचा मुलगा अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने जाळीत अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

girl was sexually assaulted
डोंबिवलीत चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
youth faked his own kidnapping
वसई : कर्जवसुलीसाठी एजंटच्या धमक्या, कंटाळून तरुणाने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव
Video: 25-Year-Old Agra Man Dies Of Heart Attack While Working In Sweet Shop
मिठाईच्या दुकानात काम करताना कोसळला; २५ वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक, हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद
throws puppy noida
संतापजनक! सात वर्षांच्या मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला २० फुटावरून फेकलं, FIR नंतर रहिवाशांचे आंदोलन

जवानांनी अग्निशमन उपकरणांचा वापर केला. मुलाचे डोके सदनिकेतील गॅलरीला लावलेल्या जाळीत अडकले होते. मुलाला वेदना होत असल्याने तो रडत होता. जवानांनी जाळीजवळ मुलाच्या आईला बसविले. कुशलतेने हायड्राॅलिक स्प्रेडर आणि जॅक या उपकरणांचा वापर करुन जवानांनी जाळीत अडकलेल्या मुलाची सुटका केली. मुलाच्या आई-वडिलांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे मनाेमन आभार मानले. जवान अशोक कडू, तुषार करे, संभाजी आटोळे, आदिनाथ पवार आदी मदतकार्यात सहभागी झाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Firefighters rescued a one year old boy who was stuck in grille in sinhagad road area pune print news rbk 25 dvr

First published on: 18-11-2023 at 11:18 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×