पुणे: सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली. कात्रज येथील दत्तनगर परिसरात ‘श्री मल्हार ज्वेलर्स’ नावाची सराफी पेढी आहे. सराफी पेढीचे मालक रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, रात्री अकरा वाजता दुचाकीवरून दोघेजण दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीने आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?

तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी दुकानामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकानातील अलार्म वाजला. त्यामुळे नागरिक सतर्क झाले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला.या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing by thieves in sarafi robbery pedhi dattnagar katraj pune print news tmb 01
First published on: 23-10-2022 at 09:05 IST