scorecardresearch

पुणे : फिरोदिया करंडक स्पर्धा शनिवारपासून सुरु; प्राथमिक फेरीसाठी ३० संघांची निवड

अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे ११ फेब्रुवारीपासून दुपारी दीड आणि सायंकाळी सहा अशा दोन सत्रांमध्ये स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे.

पुणे : फिरोदिया करंडक स्पर्धा शनिवारपासून सुरु; प्राथमिक फेरीसाठी ३० संघांची निवड
फिरोदिया करंडक स्पर्धा शनिवारपासून सुरु

विविध कलांचा एकत्रित आविष्कार असे स्वरूप असलेली आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारी फिरोदिया करंडक स्पर्धा शनिवारपासून (११ फेब्रुवारी) सुरू होत आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी ३० संघांची निवड करण्यात आली असून २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फेरी होणार आहे.

हेही वाचा- पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेने निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू

सामाजिक-आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी निर्मित आणि एचसीएल फाउंडेशन यांच्या सहकार्याने होणाऱ्या फिरोदिया करंडक आतंर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे यंदा ४९ वे वर्ष आहे. ‘रंगमंचावर एक तासाचा चित्रपट’ असे स्वरूप असून पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे ही स्पर्धा रंगणार आहे. नाटक, संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला, ॲनिमेशन, बाहुली नाट्य (पपेट शो) अशा विविध प्रकारच्या कला एकाच रंगमंचावर सादर होणारी फिरोदिया करंडक ही एकमेव अशी नावीन्यपूर्ण स्पर्धा आहे.

हेही वाचा- पुण्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी, नाराज बाळासाहेब दाभेकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार

अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे ११ फेब्रुवारीपासून दुपारी दीड आणि सायंकाळी सहा अशा दोन सत्रांमध्ये स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. यंदा पन्नासहून अधिक महाविद्यालये स्पर्धेत सहभागी झाले असून पूर्व प्राथमिक फेरी आणि मागील वर्षीच्या निकालानुसार ३० संघांची प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात आली आहे, असे स्पर्धेचे संयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 19:04 IST