डॉक्टर होण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू

तरूणी मूळची नांदेडची आहे.

MD girl, student, death,accident, hadapsar, pune,marathi news
अपघातात मृत झालेली अनुराधा पंतुलवार ही मूळची नांदेडची होती.

पुण्यातील मगरपट्टा येथे टेप्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अनुराधा पंतुलवार ( वय २५) असे अपघातात मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयामध्ये एमडीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी मगरपट्टा येथे कल्याण ज्वेलर्सजवळ एका टेम्पोने तिच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तिच्याकडे हल्मेट होते पण तिने ते डोक्यात न घालता गाडीला अडकले होते. टेम्पोवाला धडक देऊन पसार झाला असून हडपसर पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अनुराधा पंतुलवार ही सुनिताबाई आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये एमडीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. ती मूळची नांदेड येथील असून पुण्यात ती चुलत भावासमवेत राहत होती. मंगळवारी रात्री ती मगरपट्टा येथे मैत्रिणीकडे राहण्यास गेली होती. मैत्रीणीच्या घरातून कॉलेजला जाण्यासाठी निघालेल्या या तरुणीच्या दुचाकीला सकाळी साडे नऊच्या सुमारास एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने मागून धडक दिली. या घटनेत ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सीसीटिव्हीच्या माध्यमातून टेम्पोवाल्याचा शोध घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: First year md girl student death in accident hadapsar pune

ताज्या बातम्या