पुणे : व्यक्तिकेंद्रित पक्ष असलेली शिवसेना, की राष्ट्रकेंद्रित असलेला भारतीय जनता पक्ष यामध्ये आम्ही राष्ट्रकेंद्रित पक्षाची निवड केली. असे स्पष्ट करत दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे सांगितले. भाजपमध्ये प्रवेश केल्याने महापालिका उमेदवारीबाबत पक्षाचा आदेश मान्य करू, असेही या नगरसेवकांनी स्पष्ट केले.

शिवसेना (ठाकरे) पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर आणि प्राची आल्हाट यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी भाजपचे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुष्कर तुळजापूरकर, मंदार बलकवडे, राजाभाऊ शेंडगे उपस्थित होते.

Nathuram Godse Hindu Mahasabha demanded remove name Nathuram Godse from list of unparliamentary words
‘नथुराम गोडसे’ला असांसदीय शब्दांच्या यादीतून वगळा… संघ भूमीतून…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Anand Dighe and Balasaheb Thackeray
Private:
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
BJPs internal disputes in Pune erupted
शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश अन् भाजपमध्ये बँनरबाजी ! पुणे भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला फ्लेक्स लावून नाराजी व्यक्त
Shiv Sena UBT backs AAP in Delhi Assembly election
Delhi Election : टीएमसी, सपानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनेही सोडला काँग्रेसचा हात… दिल्ली निवडणुकीत ‘आप’ला जाहीर केला पाठिंबा

हेही वाचा…शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश अन् भाजपमध्ये बँनरबाजी ! पुणे भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला फ्लेक्स लावून नाराजी व्यक्त

पुण्यात शिवसेना पक्ष वाढीकडे मुंबईतील नेत्यांचे दुर्लक्ष झाले. आम्ही वारंवार सांगत होतो, मात्र त्याकडे कधीही लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी आमच्या पूर्वीच्या पक्षावर कधीच टीका करणार नाही. त्यांची भूमिका पटली नाही, त्यामुळे पक्षबदल केला, असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले.

हिंदुत्वासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय का निवडला नाही, या प्रश्नावर उत्तर देताना ओसवाल, धनवडे म्हणाले, ‘व्यक्तिकेंद्रित पक्ष की राष्ट्रकेंद्रित पक्ष यामध्ये आम्ही भाजपची निवड केली. खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असून, न्यायालयाच्या निकालानंतर हे स्पष्ट होईल.’

हेही वाचा…संकेतस्थळावर माहिती, कागदपत्रे जाहीर न करणाऱ्या शाळांवर कारवाई; सीबीएसईचा इशारा

ओसवाल म्हणाले, ‘२५ वर्षे आम्ही शिवसेनेत होतो. हिंदुत्वाविषयी मी प्रथमपासून आग्रही आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली. त्या वेळीच आम्हाला पटले नव्हते. त्यातच दररोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्यामुळे पक्षाबद्दलची नकारात्मकता वाढतच गेली.’

‘शिवसेनेत असलो, तरी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यापासूनच राजकारणाचे धडे घेतले. त्यामुळे भाजप हा काही आमच्यासाठी नवा पक्ष नाही,’ असे धनवडे म्हणाले.

हेही वाचा…राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

भाजपचा नारा राष्ट्र प्रथम असा आहे, आता महापालिकेची उमेदवारी मिळाली नाही तर मग काय करणार, या प्रश्नाला उत्तर देताना, ‘आम्ही पक्षादेश प्रमाण मानणारेच आहोत. शिवसेनेत होतो त्या वेळी तेच केले आणि आताही तेच करू,’ असे या पाच माजी नगरसेवकांनी सांगितले.

या प्रवेशामुळे पक्षामध्ये नाराजी असल्याबाबत विचारले असता, भाजपचे सरचिटणीस जोशी म्हणाले, ‘मोठ्या पक्षात अशा लहान लहान गोष्टी होतच असतात. त्यामुळे काही फरक पडणार नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला, पक्ष कार्यकर्ते म्हणून आम्ही या निर्णयाबरोबर आहोत.’

Story img Loader