‘शहर स्वच्छतेसाठी शेजारी, मित्रांना क्रियाशील बनवा’

शहरातील जवळपास पाच लाख कुटुंबीयांना ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी िपपरी महापालिकेने बकेटवाटप करण्यास प्रजासत्ताकदिनी प्रारंभ केला.

गटार सफाई यंत्रणेवर पडणारा ताण, रस्त्यावर अस्तव्यस्त पडणाऱ्या कचऱ्यासह या संदर्भातील अनेक अडचणी लक्षात घेऊन शहरातील जवळपास पाच लाख कुटुंबीयांना ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी िपपरी महापालिकेने बकेटवाटप करण्यास प्रजासत्ताकदिनी प्रारंभ केला. पालिकेच्या या उपक्रमास सहकार्य करा आणि कचरा विलगीकरणाचा संदेश आपले शेजारी व मित्र परिवारापर्यंत पोहोचवा, असे आवाहन आयुक्त राजीव जाधव यांनी यावेळी केले.

सात लिटर क्षमतेच्या प्रतिकुटुंब दोन प्लास्टिकच्या बकेट वाटपाचा प्रारंभ महापौर शकुंतला धराडे व आयुक्तांच्या हस्ते कासारवाडीत झाला, तेव्हा ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमहापौर प्रभाकर वाघेरे, अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे, सहआयुक्त दिलीप गावडे, नगरसेवक किरण मोटे, आशा धायगुडे आदी उपस्थित होते. आयुक्त म्हणाले, शहरात चार लाख ७८ हजार कुटुंबांना बकेट वाटप करण्यात येणार आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या बकेटमध्ये ठेवावा, हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक बकेटमध्ये तो वितरण करण्यात येईल. त्यानुसार, त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छता ठेवावी. महापौर म्हणाल्या, कचऱ्याचा प्रश्न सर्वच शहरांना भेडसावतो आहे. कचऱ्याचे अलगीकरण करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Five lakh bucket distribution

ताज्या बातम्या