पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे धाव घेतली होती. न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

हे ही वाचा…तक्रारदाराची तक्रार बंद करताना पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

Offensive video viral of female police sub inspector Nagpur news
महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आक्षेपार्ह ‘व्हिडिओ व्हायरल’
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Uddhav Thackeray, candidates, Kalyan, Eknath Shinde, Shiv snea
कल्याण पट्ट्यातील ठाकरेंचे उमेदवार ठरले, शिंदेचे ‘आस्ते कदम’
woman in prison
स्त्री ‘वि’श्व : गजाआडच्या स्त्रियांचं जग
kiran samant
राजापूर विधानसभेसाठी शिंदे गटाचे किरण सामंत आणि ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा उमदेवारी अर्ज दाखल
maharashtra assembly polls
सूरत, गुवाहाटीपर्यंत साथ देणाऱ्या ४१ पैकी ३७ आमदारांना शिंदेंकडून पुन्हा उमेदवारी; उर्वरित चार जणांचे काय?
Kedar Dighe and Eknath Shinde
Kopari Pachpakhadi : कोपरी-पाचपाखाडीत शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे रिंगणात!
congress raised questions on ec for not taking action on rashmi shukla
रश्मी शुक्ला यांना अभय का? झारखंडच्या पोलीस महासंचालकांच्या उचलबांगडीनंतर काँग्रेसचा सवाल

पुण्यातील ससून रुग्णालयत्तून अमली पदार्थ तस्करी करणारा ललित पाटील पोलिसांचा बंदोबस्त असताना पळून गेला. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याने पाटीलला पळून जाण्यास मदत झाल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलीस हवालदार रमेश जनार्दन काळे ,नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे धाव घेतली. सुनावणीअखेर त्यांना पुन्हा सेवेत पुनर्स्थापित करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा पुणे पोलीस दलाच्या आस्थापनेवर घेण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियंत्रण कक्ष आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.