मुलाच्या गांभीर आजाराची माहिती लपवणे आणि सुनेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या अणि पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मंगला कदम यांच्यासह पती, मुलगा,तसेच अन्य दोघांवर अशा एकूण पाच जणां विरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती कुशाग्र कदम, सासू मंगला कदम,अशोक कदम,गौरव कदम आणि स्वाती कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय पीडित महिलेला 2011 पासून पती आणि त्याचे कुटुंबीय त्रास देत होते.तिच्या पतीला गांभीर आजार असल्याचे लपवून ठेवून, तिच्या सोबत लग्न देखील लावून दिले. पीडितेच्या पतीला दुसरा कोणता तरी आजार असल्याचे डॉक्टरांशी संगनमत करून खोटा रिपोर्ट केला. त्याही पुढे जाऊन पीडित महिलेला मुल होण्यासाठी आयव्हीएफ पद्धतीची उपचार पद्धत अवलंबण्यात आली. या सर्व प्रकारा दरम्यान पीडित महिलेला सासरच्या मंडळीकडून सतत मारहाण होत राहिली.त्यावर अखेर पीडित महिलेने आम्हाला तक्रार दिली. त्या माहितीच्या आधारे संबधीत व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण