व्हेल माशाच्या उलटीची (अंबर ग्रीस) विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना डेक्कन पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या उलटीची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटी रुपये किंमत आहे.राजेंद्र राकेश कोरडे (वय २८) नवाज अब्दुला कुरुपकर (वय२४), अजिम महमुद काजी (वय ५०, तिघे रा. अंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी), ), विजय विठ्ठल ठाणगे (वय ५६ ), अक्षय विजय ठणगे (वय २६, दोघे रा. चैतन्यनगर, धनकवडी ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे: सराईत गुन्हेगाराचा बोपदेव घाटात गोळीबाराचा बनाव, व्यावसायिकाला गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
mumbai, Heroin, Police Arrest, 26 Year Old, Youth, Rs 54 Lakh, Mahim, Raheja Flyover, drugs, crime news, marathi news,
मुंबई : ५४ लाखांच्या हेरॉइनसह एकाला अटक

फर्ग्युसन रस्त्यावर व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती डेक्कन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांना मिळाली होती. सापळा लावून तिघांना पकडण्यात आले. त्यांच्या पिशवीतून व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त संदीप सिंह, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कल्याणी पाडोळे, दत्ता शिंदे, महेंद्र बोरसे, स्मिता पवार, सचिन गायकवाड, विनय बडगे, स्वालेहा शेख, बाळासाहेब भांगले आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा >>>पुणे: शहरातील बेकायदा गुटखा विक्रीवर कारवाईची मागणी; मनसेकडून पोलीस आयुक्तांना निवेदन

व्हेल माशाची उलटी म्हणजे काय ?
व्हेल माशाचा वावर खोल समुद्रात असतो. ब्ल्यू व्हेलला देव मासा म्हणून ओळखले जाते. या माशाच्या कोणत्याही अवयवाचा व्यापारी वापर गुन्हा आहे. हा मासा शारीरिक प्रक्रियेतून उलटी करतो. ती उलटी द्रव स्वरूपात असते. मात्र, उलटी पाण्यात विरघळणारी नसते. या उलटीला अंबर ग्रीस असे म्हटले जाते. त्याच्या न विरघळणाऱ्या द्रव स्वरूपामुळे या उलटीचा गठ्ठा तयार होतो. तो पाण्यावर तरंगू लागतो. हा गठ्ठा जाळ्यात अडकतो किंवा किनाऱ्यापर्यंत तरंगत येतो. अत्तर निर्मितीत एक खूप महत्त्वाचा घटक म्हणून व्हेल माशाच्या या उलटीचा वापर केला जातो असे सांगितले जाते.