कसबा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. त्यानुसार कसबा मतदार संघात २७० मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी पाच मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक पोलीस निरीक्षक अश्विनी कुमार सिन्हा गुरूवारी (९ फेब्रुवारी) सकाळी ११.३० ते दुपारी २ या वेळेत कसबा विधानसभा मतदार संघातील या पाच संवेदनशिल जाहीर करण्यात आलेल्या मतदार केंद्रांना भेट देऊन आढावा घेणार आहेत.

हेही वाचा >>> “…तर कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होऊ शकते”; कायदेतज्ज्ञांचं मोठं विधान

Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
Speculation markets, Bhandara-Gondia, polls,
मतदानानंतर सट्टा बाजार तेजीत, भंडारा-गोंदियात उमेदवारांना किती मिळतोय भाव, जाणून घ्या….
Women Voters in India
निवडणूक आयोगाने ‘तो’ कठोर निर्णय घेतला आणि महिला मतदारांची संख्या वाढली
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?

अश्विनी कुमार हे कसब्यातील मतदान केंद्र क्र. दोन अब्दुल करीम हुसैन अत्तार कोर्टवाले ऊर्दू पुणे मनपा शाळा क्र. आठ, तळमजला कसबा पेठ, मतदान केंद्र क्र. पाच राजमाता जिजाबाई प्रा. शाळागृह, पुणे मनपा शाळा क्र. सहा, खोली क्र. तीन, मतदान केंद्र क्र. दहा राजमाता जिजाबाई प्रा. शाळागृह, पुणे मनपा शाळा क्र. सहा कसबा पेठ, खोली क्र. सहा, मतदान केंद्र क्र. ७७ सुंदराबाई राठी सेवासदन माध्यमीक प्रशाला तळमजला रुम क्र. एक सदाशिव पेठ व मतदान केंद्र क्र.९४ गोपाळ हायस्कूल, तळ मजला खोली क्र. एक, १३४७ सदाशिव पेठ या केंद्रांचा समावेश आहे.

मतदान केंद्रावरील मतदारांना निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांच्याशी संवाद साधायचा असल्यास त्यांनी गुरुवारी या मतदान केंद्रांवर सकाळी ११.३० ते दुपारी दोन या वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.