पिंपरी : आळंदी येथील इंद्रायणी नदीतील पाण्यावर जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) आला आहे. मागील सलग दोन दिवसांपासून नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येत आहेत. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा >>> पुणे: रक्ताचा नमुना आईचाच; न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, अगरवाल दाम्पत्यासह डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत वाढ

fire, slipper , factory,
वसईच्या चिंचोटी येथे चप्पल तयार करणाऱ्या  कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू
thane, Kolshet Bay Filling Case, Encroachment on Mangroves in Balkum, Encroachment on Mangroves in Kolshet, Forest Minister Sudhir mungantiwar, officials are in a round of inquiry, thane news
कोलशेत खाडी भरावाप्रकरणाची होणार चौकशी; वनमंत्र्यांच्या आदेशामुळे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
8 Zika patients found in maharashtra in two months
राज्यात दोन महिन्यांत सापडले झिकाचे आठ रुग्ण; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
Nashik Dam Protest, Nashik, Administration Increases Water Discharge from Kashyapi Dam, nashik news,
काश्यपीतील विसर्गात पुन्हा वाढ, दुष्काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाची मध्यस्थी; ग्रामस्थांची नरमाई
thane ghodbunder rmc project marathi news
घोडबंदरच्या भरवस्तीतील आरएमसी प्रकल्प सुरूच, आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त; संबंधित यंत्रणेचे होतेय दुर्लक्ष
Excavation of Wadala to Paral water tunnel completed by Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिकेतर्फे जलबोगद्यांचा विक्रम… न्यूयॉर्कपाठोपाठ सर्वांत मोठे जाळे… पण यातून पाणी प्रश्न सुटणार का?
Ambernath, Badlapur, water,
अंबरनाथ, बदलापुरकरांनो पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घ्या, जीवन प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन; तक्रारीसाठी क्रमांक जाहीर
loksatta analysis marathwada water grid project and how much is it useful
विश्लेषण : मराठवाड्याच्या पेयजलासाठी पाण्याचे ‘ग्रिड’? काय आहे ‘वॉटर ग्रिड’ योजना? तिचा उपयोग किती?

इंद्रायणी नदीचा उगम हा लोणावळा परिसरातून झाला. ही नदी अनेक गावे, शहरे पार करत आळंदीतून पुढे वाहत जाते. इंद्रायणी नदीचे १९ किलोमीटर पात्र पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. शहरातील औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे. इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु, नदीची अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे. आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून, अवघ्या नदी पात्रात तवंग दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्यानेच नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा आळंदीत पाण्यावर तवंग येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनीच नदीची अशी अवस्था आहे. आषाढी पायी वारी पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नदीतील पाण्यावर तवंग आले आहेत.