पुणे : वाहतूक पोलीस आणि महापालिकेने संयुक्तपणे केलेल्या उपाययोजनांमुळे सोलापूर रस्त्यावरील कोंडी कमी झाली असून, वाहतुकीचा वेग वाढला आहे. सोलापूर रस्त्याप्रमाणे शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवरील वाहतूक लवकरच गतिमान होणार आहे.

‘सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, तसेच वेग याबाबत पोलीस आणि महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. स्वारगेटपासून हडपसरपर्यंत वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी रामटेकडी पूल, रविदर्शन, तसेच फातिमानगर चौकात वाहतूकविषय सुधारणा करण्यात आल्या. या कामांमुळे वाहतुकीचा वेग वाढला असून, कोंडीही दूर झाली आहे,’ अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ विभाग) अनिरुद्ध पावसकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. मेटा आर्क कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद रोडे, वाहतूक नियोजक निखिल निहार, तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी या वेळी उपस्थित होते.

redevelopment projects in Pune hit traffic problem in city
लोकजागर : न वाहणारी वाहतूक
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Navi Mumbai RTO action against indiscipline rickshaw drivers
नवी मुंबई : आरटीओचा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा
150 traffic police deployed on alternate roads to avoid traffic jams on Shilpata road
शिळफाटा रस्त्यावर वाहतूक पोलिसांची गस्त वाढली, जड, अवजड वाहनांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याच्या सूचना
Punes Comprehensive Mobility Plan
पुण्यातल्या ट्रॅफिक जॅमवर नवा उतारा; काय आहे पुण्याचा ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन’?
Hinjewadi it park traffic jam news
पिंपरी : शहरातील एनएच-४८ महामार्ग सेवा रस्त्यांचा होणार विस्तार, आयटी पार्क हिंजवडीतील कोंडी सुटणार…
Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा
Hinjewadi traffic jam
‘आयटी’तील पुणेकरांची आणखी वर्षभर कोंडी, उन्नत मार्ग रखडल्याने हिंजवडीकरांना दिलासा नाहीच

हेही वाचा >>>धक्कादायक: “पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा, सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

‘सोलापूर रस्त्याच्या धर्तीवर येत्या काही दिवसांत शहरातील प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना केल्या जाणार आहेत. नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा, पाषाण, बाणेर, संगमवाडी, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता या रस्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांवरील वाहतूकविषयक कामे केल्यानंतर कोंडीची समस्या कमी होऊन वाहतूक अधिक गतिमान होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर रस्ता असा झाला कोंडीमुक्त…

सोलापूर रस्त्यावर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या उपाययोजनांमध्ये रामटेकडी चौकात वैदूवाडी ते रामटेकडी चौकादरम्यान असलेले दुभाजक काढून रस्ता रुंद करण्यात आला. रस्त्याच्या मध्ये असलेले बस थांबे कडेला हलवण्यात आले. या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. सातत्याने कोंडी होणाऱ्या भैराबानाला चौकात भैरोबानाला चौकीच्या पुढील वळणावरचा रस्ता रुंद करून स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली. फातिमानगर चौकातील वळण बंद करण्यात आले. या वाहनांना पर्यायी मार्ग दिल्याने येथील कोंडी सुटण्यास मदत झाली. शंकरशेठ रस्त्यावरील गोळीबार मैदान, रामटेकडी पूल, वैदूवाडी चौक, हडपसर गाव चौक, गाडीतळ चौक, रविदर्शन चौक, पंधरा नंबर चौक, लक्ष्मी कॉलनी चौकात उपाययोजना करण्यात आल्या.

हेही वाचा >>>पुणे : ज्येष्ठ नागरिकाचे हात पाय बांधत चोरी करणाऱ्या अल्पवयीन केअर टेकरला १२ तासात अटक

सुधारणा नेमक्या काय?

– चौकांतील कोंडी दूर करणे

– पदपथावरील अतिक्रमण हटविणे

– दुभाजकांत सुधारणा

– वाहने लावण्यासाठी जागा

Story img Loader