Video : मुंबई-पुणे महामार्गावरील नयनरम्य दृश्य

खंडाळा घाटातील दृश्यं थक्क करणारे असेच होते

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खंडाळा घाटात सोमवारी सकाळी धुक्यांचा दुहेरी रंग अनुभवला. प्रवाशांसाठी हे दृश्य नयनरम्य असले तरी यावेळी वाहन चालकांना मात्र, चांगलीच कसरत करावी लागली. खंडाळा-लोणावळा परिसरातील पावसाळ्यातील धबधबे आणि हिवाळ्यातील धुकं नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. पण सोमवारी सकाळी साडे आठ ते नऊ या अर्ध्या तासाच्या काळात खंडाळा घाटातील दृश्यं थक्क करणारे असेच होते.

सुर्याची किरणं मनमोहित करणारी अशीच होती. महामार्गालगतच्या घाटातील गडद धुक्याने प्रवाशांना एका वेगळ्या दुनियेत नेलं. जणू प्रवाशी द्रुतगती मार्गावरून नव्हे तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश सारख्या पर्यटन स्थळीच आहेत. हा आनंद देणारा प्रवास अर्ध्या तासानंतर पर्यटकांना चिंतातूर ठरला. त्यानंतर धुकं इतक वाढलं की, रस्ता दिसेनासा झाला. दोन्ही दिशेनं जाणाऱ्या वाहन चालकांसाठी ही एक कसोटीच होती. चालकांची कसरत आणि प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. हवामानातील या बदलामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fog on pune mumbai express way khandala ghat

ताज्या बातम्या