पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा | For more than 7 thousand 300 posts the departmental recruitment fair will be held on December 4 pune print news amy 95 | Loksatta

पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालय, पिंपळे गुरव येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्यातर्फे ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा
सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालय, पिंपळे गुरव येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्यातर्फे ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नवी सांगवी येथील दि न्यू मिलेनियम इंग्रजी माध्यम शाळा येथे होणाऱ्या या मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक, इतर सेवा क्षेत्रातील सुमारे ४० पेक्षा जास्त खाजगी उद्योगांतील सुमारे सात हजार ३०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती राबवली जाणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: कोथरुडमधील पतसंस्थेत पावणेदहा कोटींचा अपहार; लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी ही माहिती दिली. इयत्ता आठवी, नववी, दहावी, कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र आहेत. या मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणारी विविध महामंडळे, दिव्यांग उमेदवारांसाठी योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडून माहिती देणारी दालनेही लावली जातील. त्यामुळे उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती उपलब्ध होईल. इच्छूक उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पसंतीक्रम नोंदवणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज, आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 23:18 IST
Next Story
पुणे: कोथरुड भागात गांजा विक्री एकास अटक; साडेसात किलो गांजा जप्त