scorecardresearch

पुणे : तरुणीला धमकावून बलात्कार करणाऱ्या एकास सक्तमजुरी

तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकाला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

punishment person pune
तरुणीला धमकावून बलात्कार करणाऱ्या एकास सक्तमजुरी (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणी यांनी चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. इस्माइल अब्दुल रेहमान करजगी (वय ४३, रा. सहारानगर, सोलापूर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे.

करजगीविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात २००८ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तरुणी आणि करजगी यांची ओळख होती. फेब्रुवारी २००८ मध्ये त्याने बतावणी करून तिला सिंहगड रस्ता भागातील एका सदनिकेत नेले होते. त्याने पीडित तरुणीला धमाकावून तिच्यावर बलात्कार केला होता. छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. ध्वननिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीकडून वेळोवेळी पैसे उकळून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला होता.

हेही वाचा – ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

हेही वाचा – संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे उद्घाटन पुढील वर्षी; नितीन गडकरी यांची माहिती

अखेर घाबरलेल्या तरुणीने हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर करजगीला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकारी वकील ॲड. एस. सप्रे यांनी बाजू मांडली. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने करजगीला चार वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा हवेली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी तपास केला होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 16:02 IST