लोकसत्ता वार्ताहर

शिरूर: संविंदणे (ता. शिरूर) येथे शेतात आढळून आलेले बिबट्याची चार बछडे पुन्हा मातेकडे सुखरुपपणे पोहोचविण्यात वन विभागास यश आले आहे.

house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर
Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

याबाबत माहिती देताना शिरूरचे वनपरिक्षेत्र आधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले, की संविंदणे येथील लंघे मळ्यात उसाच्या एका शेतात बिबट्याचे चार बछडे आढळून आले होते. साधारणपणे एक ते दीड महिन्याचे हे बछडे होते. ज्या उसाच्या शेतामध्ये हे बछडे सापडले होते त्याच परिसरात एका बास्केटमध्ये हे चारही बछडे ठेवण्यात आले होते. सोमवारी (२० मार्च) रात्री या बछड्याची आई उसाच्या शेतात आली आणि आपले सर्व बछडे पुन्हा घेऊन गेली.

हे बछडे पुन्हा मातेकडे पोहोचविण्याचा कामी वनपाल गणेश पवार, ऋषीकेष लाड, हनुमंत कारकुड, शौकत शेख यांनी सहभाग घेतला. दरम्यान हे बिछडे पुन्हा या परिसरात कोण्याचा शेतात आढळून आल्यास वनविभागास कळवावे असे आवाहन म्हसेकर यांनी केले.