बिबट्यांचे चार बछडे पुन्हा मातेकडे पोहोचविण्यात वन विभागाला यश

संविंदणे येथील लंघे मळ्यात उसाच्या एका शेतात बिबट्याचे चार बछडे आढळून आले होते.

leopard cubs
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता वार्ताहर

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

शिरूर: संविंदणे (ता. शिरूर) येथे शेतात आढळून आलेले बिबट्याची चार बछडे पुन्हा मातेकडे सुखरुपपणे पोहोचविण्यात वन विभागास यश आले आहे.

याबाबत माहिती देताना शिरूरचे वनपरिक्षेत्र आधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले, की संविंदणे येथील लंघे मळ्यात उसाच्या एका शेतात बिबट्याचे चार बछडे आढळून आले होते. साधारणपणे एक ते दीड महिन्याचे हे बछडे होते. ज्या उसाच्या शेतामध्ये हे बछडे सापडले होते त्याच परिसरात एका बास्केटमध्ये हे चारही बछडे ठेवण्यात आले होते. सोमवारी (२० मार्च) रात्री या बछड्याची आई उसाच्या शेतात आली आणि आपले सर्व बछडे पुन्हा घेऊन गेली.

हे बछडे पुन्हा मातेकडे पोहोचविण्याचा कामी वनपाल गणेश पवार, ऋषीकेष लाड, हनुमंत कारकुड, शौकत शेख यांनी सहभाग घेतला. दरम्यान हे बिछडे पुन्हा या परिसरात कोण्याचा शेतात आढळून आल्यास वनविभागास कळवावे असे आवाहन म्हसेकर यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 18:11 IST
Next Story
पोलीस निरीक्षकाच्या सात वर्षीय मुलाच्या सायकलस्वारीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद
Exit mobile version