पुणे : आपल्याला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून जाणूनबुजून सातत्याने डावलले जाते, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षातील शहर पदाधिकाऱ्यांविरोधात नाराजीचा सूर आ‌ळवला आहे. रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्त पुणे मनसेत नाराजीनाट्य उफाळून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कसबा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने सामूहिक रामरक्षा पठण आणि श्रीराम आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रम पत्रिकेत वसंत मोरे वगळता शहरातील इतर सर्वच बड्या पदाधिकाऱ्यांची नावे असल्याने वसंत मोरे नाराज झाले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या पत्रिकेत रामरक्षा पठण मनसे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशांत यादव यांच्या हस्ते, तर प्रभू श्रीरामांची आरती मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे, बाळा शेडगे आणि गणेश सातपुते यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचा उल्लेख होता. शहरातील सर्वच बडे पदाधिकारी या कार्यक्रमाला निमंत्रित असताना केवळ आपल्याला वगळल्याने मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – गिरीश बापट यांचे सर्व पक्षीय नेत्याशी जिव्हाळ्याचे संबध होते: अजित पवार

हेही वाचा – भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्याकडे २५ लाखांची खंडणी

वसंत मोरे म्हणाले, कार्यक्रम पत्रिकेत मी आणि अनिल शिदोरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. हे पक्षातील काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. यासंदर्भातील तक्रार मी अनिल शिदोरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आता थेट राज दरबारी न्याय मागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former city president of mns vasant more is again unhappy against the city officials pune print news vvk 10 ssb
First published on: 31-03-2023 at 17:13 IST