लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पिंपरी : महायुतीत चिंचवडची जागा भाजपला सुटल्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केल्यानंतरही उमेदवारी न मिळाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी अखेर अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे. सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे काटे यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीकडून लढत असलेले भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्या अडचणीत भर पडली आहे.
महायुतीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने घ्यावी अशी माजी नगरसेवकांची भूमिका होती. परंतु, ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा या महायुतीच्या सूत्रानुसार चिंचवडची जागा भाजपला सुटली. भाजपने विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नाना काटे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मात्र, या पक्षाने राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काटे यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर केले.
काटे म्हणाले, निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर मी ठाम आहे. नागरिक माझ्यासोबत आहेत. पोटनिवडणुकीत मला एक लाख मते पडली होती. नागरिकांच्या विश्वासावर मी पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार) पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत राहतील. अजित पवार यांनी तयारी करण्यास सांगितले होते. परंतू, मतदारसंघ भाजपला सुटला. शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांशी चर्चा केली होती. त्यांनी त्यांची भूमिका पार पाडली. आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून आमची भूमिका स्पष्ट करू असे काटे यांनी सांगितले. सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे काटे यांनी सांगितले.
दरम्यान, जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला होता. एकत्रित राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात स्पर्धा झाली होती. त्यावेळी काटे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. तर, कलाटे यांनी बंडखोरी केली होती. आता कलाटे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काटे यांनी बंडखोरी करणार असल्याचे सांगितले आहे.