माजीमंत्री विजय शिवतारेंचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवणार पत्र

आजच्या परिस्थितील संजय राऊतच जबाबदार असल्याचंही म्हणाले आहेत.

Anger against NCP in Shiv Sena, Shiv Sena split in Pune District
राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील खदखद बाहेर, पुणे जिल्ह्यातील शिवसेनेला खिंडार

पुरंदर विधान सभा मतदार संघाचा माजी आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेच बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पाठिंबा दर्शवला आहे. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे जाहीर केले.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करत, “आजच्या परिस्थितीला संजय राऊत हे जबाबदार आहेत, अवघ्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांना विचारा. शिवसेनेला दावणीला बांधण्याचं काम देखील संजय राऊतांनी केलं आहे. ५६ वर्षाची स्वाभिमानी शिवसेना बारामतीच्या वळचळणीला नेऊन उभा करण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे, आम्ही त्यांचा निषेध करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक नाराज आहेत. ” असे बोलून दाखवले.

याशिवाय, “आपण दोन हजार कार्यकर्त्यासह ठराव करून त्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना थोड्याच वेळात पाठविणार आहोत”, असेही त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले.

पाहा व्हिडीओ –

असे आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former minister vijay shivtares support to eknath shinde svk 88 msr

Next Story
पिंपरी पालिका निवडणुकीतील मतदार याद्यांमध्ये घोळ ; दीड ते अडीच हजार नावे मूळ प्रभागांकडून दुसरीकडे ; खासदार श्रीरंग बारणे यांची तक्रार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी