लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : लोकसभेला शिरुरमधून उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लांडे यांनी पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांची मंगळवारी (१० सप्टेंबर) भेट घेतल्याने लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Santhosh Singh Rawat supporter of Vijay Wadettiwar is in touch with Sharad Pawar group
शरद पवार गटाच्या संपर्कात आणखी एक नेता! जयंत पाटलांसोबत कारप्रवास अन्…
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Ajit Pawr NCP MLA Kamlesh Kumar Singh
Kamlesh Kumar Singh : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का; ‘हा’ आमदार भाजपात प्रवेश करणार
Sharad Pawar Group Leader Said this thing About Mahayuti
Sharad Pawar : “महायुतीतला मोठा मासा लवकरच आमच्या पक्षात”, शरद पवारांच्या पक्षातील नेत्याचा रोख कुणाकडे?
Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण
Ajit pawar and Sharad Pawar
Ajit Pawar : “मी शरद पवारांच्या डोळ्यांत डोळे घालून…”, अजित पवारांच्या विधानाची चर्चा!
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “आम्ही…”
bachchu kadu on ajit pawar faction mla
Bachchu Kadu : “अजित पवार गटाचे अर्ध्याहून अधिक आमदार…”; प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा!

तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघ आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार लांडे यांना सलग दोन वेळा भोसरीतून पराभव पत्करावा लागला आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांना पराभूत केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर लांडे यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यांनी लोकसभेला शिरूरमधून उमेदवारी मागितली. ‘मला उमेदवारी देत नसाल, तर आयात उमेदवार देऊ नका. महेश लांडगे यांना उमेदवारी द्यावी. त्यांचे काम करायला मी तयार आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, अजित पवार यांनी लांडे यांची मागणी फेटाळली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिल्याने लांडे नाराज झाले. ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ या महायुतीच्या सूत्रामुळे विधानसभेलाही संधी मिळणार नसल्याने लांडे यांची अडचण झाली आहे.

आणखी वाचा-अतिवृष्टीचा सीताफळाला फटका बसला? जाणून घ्या, जुलै महिन्यातील पावसामुळे काय झालं

विधानसभेसाठी इच्छुक असलेले त्यांचे जवळचे नातलग राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेतला असून ते आमच्यासोबत असल्याचे गव्हाणे यांनी स्पष्ट केले होते. मात्र लांडे यांनी सावध भूमिका घेतली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे लांडे यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच त्यांनी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभास्थळाचा आढावा घेतला होता. मात्र, ते सभेला गैरहजर राहिले होते. त्यांच्या पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. तेव्हापासून लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली आहे. लांडे यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची, तर मंगळवारी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यात नकार दर्शविला. मात्र भेट झाल्याचे त्यांनी नाकारले नाही.