पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय अर्थात नूमवि ही शाळा मोठ्या, ज्येष्ठ विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आज (शनिवार) भरून गेली. यामध्ये ३० ते ७५ वर्षे वयापर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता. आम्ही नूमवी आणि नूमवि शाळेच्या १९९७ च्या रौप्य महोत्सवी बॅचतर्फे माजी विद्यार्थ्यांची ‘एक दिवसाची शाळा’ या अभिनव कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचे वर्ग भरले, त्यांना त्यांच्या त्या वेळच्या शिक्षकांनी पुन्हा शिकवले. जवळपास आठशे ते हजार विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसरात पुन्हा उत्साह संचारला.
नूमविच्या १९५० ते २०१३ पर्यंतच्या बॅचचे सुमारे ८५० ते ९०० माजी विद्यार्थी सहभागी होणार आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे वर्ग झाले. राष्ट्रगीत, प्रार्थना, मधली सुट्टी आणि अभ्यासाच्या दोन तासासह ही एक दिवसाची शाळा माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वात घेऊन गेली.
या आठवणी अधिक संस्मरणीय करण्यासाठी मधल्या सुट्टीत वडापाव, चन्यामन्या बोरं, गोळ्या, चिक्या, चहा, यांचा आस्वाद घेता येणार आहे. त्याचबरोबर, सेल्फी पॉईंट आणि जुन्या आठवणींचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.